औरंगाबाद – वॉशरूमला जायच्या निमित्ताने बाहेर जाऊन प्रश्नपत्रिकाचे मोबाईलमध्ये फोटो घेणाऱ्या परीक्षार्थी महिलेवर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी मिलिंद महाविद्यालयात ही घटना घडली. पर्यवेक्षक शांतीलाल दगडू राठोड यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात रविवारी एनडीए व एनएची परीक्षा पार पडली. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही परीक्षा होती. या परीक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. मिलिंद कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असताना एक परीक्षार्थी महिलेने वॉश रूमला जायचे कारण सांगितले. हे कारण सांगून ती बाहेर पडली.
सदर महिला प्रश्नपत्रिका सोबत घेऊन गेली होती. या प्रश्नासंचाचे फोटो तिने घेतले. ती आल्यावर संशय आल्याने पर्यवेक्षक शांतीलाल राठोड यांनी तिचा मोबाईल तपासला.त्यात प्रश्नपत्रिकेचे फोटो दिसून आले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक केदार पुढील तपास करीत आहेत.
५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…