जेवण वाढण्यास नकार देणाऱ्या बायकोवर दारुड्या नवऱ्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प पाच परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गंभीर अवस्थेत जखमी बहिणीला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या मेव्हण्यालाही चाकूचा धाक दाखवून मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हल्लेखोर नवऱ्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या नवऱ्याचे नाव आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प पाच परिसरात हल्लेखोर नवरा एका चाळीत बायको अधिरा सोबत राहतो. त्यातच ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आरोपी नवरा दारू पिऊन घरी आला. त्यावेळी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने झोपेतून उठवत बायकोला जेवण वाढण्यास सांगितले. मात्र बायोकने जेवण वाढण्यास नकार दिला. याचा रागतून त्याने बायकोला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी तसेच झाडू व लाटण्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बायकोच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. तर बाप आईला मारहाण करत असल्याने पाच वर्षाचा मुलगा मध्ये आला असता त्यालाही ढकलून दिल्याने तो खाली पडला. त्याच्या उजव्या पायाच्या मांडीला मुका मार लागला.
जखमी अवस्थेत बहिणीला पाहून तिचा भाऊ ईश्वर हा उपचारासाठी बहिणीला दवाखान्यात घेऊन जात असताना आरोपीने त्यालाही शिवीगाळ करत हाताबुक्क्याने मारहाण केली. तसेच मेव्हण्याच्या उजव्या हाताला चावाही घेतला. त्यानंतर स्वतःजवळ असलेला धारदार चाकू दाखवून बायकोला व मेव्हण्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिरा पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी नवरा दिलीप पाटील यांच्याविरूद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार करीम तढवी करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…