येथील उपनगरातील सांताक्रूझ येथे एका १९ वर्षीय तरुणाने प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉल करत असताना स्वतःला पेटवून घेतले पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पीडित सागर परशुराम जाधव हा ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी रात्री उशिरा एका गणपती मंडपात भेट दिल्यानंतर एका विशिष्ट रस्त्याने जाण्यावरून सागरचा त्याच्या मैत्रिणीशी फोनवरून वाद झाला. रागाच्या भरात त्या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी दिली. त्याचवेळी त्याने लगेच स्वतःला पेटवून घेतले. सागरने सुती शर्ट घातला होता. त्यामुळे त्याला लगेच आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सागर जाधव याच्या घरी असलेल्या कुटुंबीयांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. त्याला रुग्णालयात नेले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की त्याच्या टोकाच्या पाऊलासाठी कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…