२ कोटी ८० लाखावर डल्ला
एटीएम मशीनमध्ये कॅश डीपोजीट करणाऱ्या कंपनीचा वाहनचालक 2 कोटी 80 कोटी रुपये घेऊन फरार झाल्याची घटना सोमवारी 5 सप्टेंबरला गोरेगांव येथे घडली आहे. कंपनीचे कर्मचारी एटीएममध्ये रोकड जमा करण्यासाठी गेले असता वाहनचालक 2.80 कोटींनी भरलेले वाहन घेऊन फरार झाला. मुंबई पोलिसांनी सोमवारी दुपारी घटना घडताच व्हॅनच्या चालकाचा शोध सुरू केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील युनियन बँकेतकॅश भरणारी व्हॅन पैसे भरण्यासाठी पोहोचली असताना ही घटना घडली. कर्मचारी एटीएम मशीनमध्ये रोकड जमा करण्यात व्यस्त असताना उदय भान सिंग नावाचा चालक पैसे असलेल्या व्हॅनसह पळून गेला. हा वाहन चालक दोन महिन्यांपूर्वी कंपनीत चालक म्हणून रुजू झाला होता. एटीएम मशीनमध्ये कॅश डिपोझिट करायला गेलेले चालकाचे सहकारी कॅश व्हॅन ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणी परतल्यानंतर कर्मचाऱ्यांना ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी जीपीएस ट्रॅकर तपासला.
गोरेगाव पश्चिमेतील पिरामल नगर परिसरात एका निर्जन ठिकाणावरून व्हॅनचा शोध घेऊन ती जप्त करण्यात पोलिसांना यश आले. परंतु चालक अद्याप फरार आहे. आरोपींनी 2.80 कोटी रुपयांची रोकड पळवल्याची माहिती मिळाली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…