अंगझडती घेतली,खिशात तंबाखू निघाली,आरोपींनी केली बेदम मारहाण
तंबाखू दिली नाही म्हणून एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या शिवाजी उद्यम नगर परिसरातल्या कोटीतीर्थ तलाव येथे आज सकाळी ही घटना घडली. एकीकडे गणेश विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे ही धक्कादायक घटना समोर आली. शंकर सखाराम कांबळे, (वय 56 रा. माळापुढे, ता. शाहुवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. राजारामपुरी पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला आहे.
मृत शंकर सखाराम कांबळे हे आपल्या मुलगीकडे राहायला आले होते. आज सकाळी कोटी लतीर्थ तलाव परिसरात फिरायला गेले असता या ठिकाणी संशयित आरोपी ओंकार शेंडगे (वय 28, रा. यादवनगर) आणि अजय सूर्यगंध (वय 27, रा. यादवनगर) यांनी कांबळे यांच्याकडे त्यांनी तंबाखू मागितली. मात्र आपल्याकडे तंबाखू नसल्याचे सांगत ते पुढे निघून गेले. संशयित दोघांनी कांबळे यांना पकडून त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांना तंबाखू सापडली. आपल्याशी खोटं का बोलला या रागातून दोघांनी कांबळे यांना बेदम मारहाण केली. शिवाय शेजारील दगड व बांबूने त्यांना मारहाण केली . एका आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याच परिसरात एका सीसीटीव्हीमध्ये हे दोघेही संशयित कैद झाले आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…