ताज्याघडामोडी

कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट, चार ताब्यात, दोघे पसार

मित्राच्या वाढदिवसाचा केक चक्क कोयत्याने कापून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे सहा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या असून, अन्य दोघांनी गुंगारा देत धूम ठोकली आहे. ही घटना लातुरातील इस्लामपुरा परिसरात घडल्याचे समोर आले. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, लातुरातील सम्राट चौक परिसरात राहणारा ऋतिक सुरेश हलगुंडे (वय १८) याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी सार्वजनिक ठिकाणी रात्री कोयत्याने केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान, हा प्रकार सायबर सेल आणि पोलिसांच्या निदर्शनास आला. याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनीही लागलीच शोधमोहीम हाती घेतली.

याबाबत खबऱ्याने टीप दिल्यानंतर वाजिद चाँद सय्यद (वय २०, रा. इस्लामपुरा लातूर), संविधान ब्रह्मदेव धावरे (वय १८ रा. राहुल नगर, लातूर), सम्यक शाहूराज कांबळे (वय १९ रा. इस्लामपुरा लातूर) यांच्या मुसक्या आवळल्या. तर अन्य दोघे अमन मुजाहिद दख्खने (रा. इस्लामपुरा लातूर) आणि गोपाळ मदने ( रा. श्रीकृष्ण नगर, लातूर) हे पोलिसांना गुंगारा देत निसटले. त्यांच्या मागावर पोलीस पथक आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago