पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागमध्ये तृतीय वर्ष मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ बिल्डिंग्स युजींग रेवीट’ या विषयावर आधुनिक पध्दतीचे रेवीट हे सॉफ्टवेअर वापरुन स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे प्रारूप त्रिमितीय (3D) आराखडे तयार करण्याविषयीची आणि सध्याच्या बदलत्या काळानुसार “बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM)”, या संकल्पनेला समजून घेण्यासाठी सदर साप्ताहिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती व ती यशस्वीपणे संपन्न झाली असल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी दिली.
हि कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या प्रकल्पाधारीत शिक्षण या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली, समन्वयक प्रा. गणेश लकडे यांच्या उत्कृष्ट नियोजनेतून आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत एकूण १२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना फोर डायमेंशन (4Dimension), पुणे येथील तज्ञ व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. पराग देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश लकडे यांच्यासह स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…