ताज्याघडामोडी

चून चून के, गिन गीन के मारे जायेंगे राड्यानंतर बंडखोर आमदार गायकवाड यांची पुन्हा धमकी

ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर ” चून चून के गिण गीण के मारे जायंगे, म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकी दिलीय..” तर कालच्या राड्यात कमी झाले कारण त्याठिकाणी पोलीस होते, मात्र पुढच्या वेळेस आणखी जास्त राडा होईल” असा इशारा ही गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.यामुळे बंडखोर आमदार संजय गायकवाड आणि शिवसेना वाद उफाळण्याची शक्यता आहे.

बुलढाण्यामध्ये काल शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम चालु असताना, आमच्या नेत्यांवर टीका का करता, म्हणत शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात राडा करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावला. त्यानंतर पुन्हा संजय गायकवाड यांनी ही धमकी दिल्याने शिवसैनिक आणि बंडखोर आमदार गायकवाड यांच्यात जोरदार राडा होण्याची शक्यता आहे.

बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या नेत्यांवर टीका का करता?, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती.

बुलढाण्यामध्ये झालेल्या राड्याआधी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला होता. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे बुलढाण्यातील राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago