सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण वसंतराव काळे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त् वसंतदादा मेडिकल फौंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल, पंढरपूर व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संयुक्त् विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिरआयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते व वसंतदादा मेडिकल फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे यांचे अध्यक्षतेखाली कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक, दिनकर चव्हाण, भारत कोळेकर, विलास जगदाळे, राजाराम पाटील, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन महादेव देठे, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे व कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांचे प्रमुख उपस्थित करण्यातआले.
कार्यक्रमाचे सुरुवातीस श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे व संस्थापक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजनमान्यवरांचे शुभहस्ते करण्यातआले.
यावेळी सुमारे 400 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले. सदर रुग्णांवर कारखान्याच्या मेडिकल ऑफिसर डॉ.सौ.जयश्री शिनगारे, जनकल्याण हॉस्पीटलच्या डॉ.अमृता म्हेत्रे, डॉ.अनिल काळे,डॉ. पंढरीनाथपाटील,डॉ. गिरीधर चलवाड ,व्यवस्थापक सद्दाम मनेरी या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार केले. यावेळी वसंतदादा मेडिकल फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे मेडिकल ऑफिसर डॉ.सौ.जयश्री शिनगारे, जनकल्याण हॉस्पीटलच्या डॉ.अमृता म्हेत्रे, डॉ.अनिल काळे,डॉ. पंढरीनाथ पाटील, डॉ.गिरीधरचलवाड, व्यवस्थापक सद्दाम मनेरी यांचे तसेच जनकल्याण हॉस्पीटलचे सर्व स्टाफ यांचे आभार कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी मानले.
सदर प्रसंगी डॉ.सुधिर शिनगारे यांनी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त् गोरगरिबाची सेवा घडावी या हेतुने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, कारखाना कार्यस्थळावरील व परिसरातील गोरगरिब गरजुना तसेच कामगारांना व त्यांचे कुंटुंबियांसाठी मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे सांगुन, जनकल्याण हॉस्पीटलच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या योजनांची व हॉस्पीटलच्या वतीने विविध आजारावर करण्यात येत असलेल्या इलाजाची माहिती दिली.
यावेळी अनिल नागटिळक, सिध्देश्वर चव्हाण, कारखान्याचे डेप्यु.जन.मॅनेजरके.आर.कदम, टेक्निकल जनरल मॅनेजर प्रकाश तुपे, चिफइंजिनिअर एस.एन.औताडे, डिस्टीलरी मॅनेजरपी.डी.घोगरे, मुख्यशेती अधिकारी अे.व्ही.गुळमकर, चिफअकैंटंट बबन सोनवले, सिव्हिल इंजिनिअर एन.एम.काळे, परचेस ऑफिसर सी.जे.कुंभार, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर कुंभार, हेडटाईम किपर संतोष काळे, केनयार्ड सुपरवायझर दिलीप काळे, सभासद, अधिकारी व कर्मचारी, प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…