ताज्याघडामोडी

छेडछाडीला विरोध केल्याने महिलेला चालत्या ट्रेनमधून फेकले, महिलेचा मृत्यू

एक मद्यधुंद व्यक्ती ट्रेनमध्ये एका 30 वर्षीय महिलेची छेडछाड करत होता. यावेळी महिलेचा नऊ वर्षांचा मुलगाही तेथे उपस्थित होता. यावेळी या महिलेने त्या व्यक्तीस विरोध केल्यावर आरोपीने महिलेला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने देखील ट्रेनमधून उडी मारली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपी जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना शहराजवळ ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, ट्रेनच्या डब्यात फक्त तीन प्रवासी होते. मनदीप कौर असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी मंचला नरवाना येथून ट्रेनमध्ये चढला होते. तो दारूच्या नशेत होता. महिला एकटी प्रवास करत असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध केल्याने त्याने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने महिलेला ट्रेनमधून ढकलले आणि स्वतः उडी मारली. हे दृश्य पाहून महिलेचा मुलगा रडू लागला.

मनदीप कौरचे पती हरजिंदर यांनी सांगितले की, त्यांची पत्नी गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती. 1 सप्टेंबर रोजी रात्री ती ट्रेनने तोहाणा येथे परत येत होती. तोहानापासून सुमारे 15 ते 20 किमी अंतरावर आल्यावर महिलेने तिच्या पतीला फोन केला आणि सांगितले की ती स्टेशनवर पोहोचणार आहे, त्यामुळे पत्नीला आणण्यासाठी ते स्टेशनवर पोहोचले. हरजिंदर स्टेशनवर पत्नी आणि मुलाची वाट पाहत होता. ट्रेन थांबली पण, मुलाला रडताना पाहून हरजिंदरने विचारले की आई कुठे आहे? यावेळी मुलाने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago