गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून स्वेरी अंतर्गत असलेल्या दोन्ही डी. फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा या वर्षी देखील कायम राखली आहे. विशेष म्हणजे डी. फार्मसीच्या दोन्ही महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान विद्यार्थीनींनी मिळविला आहे.
पंढरपूर परिसर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा फार्मसीच्या शिक्षणासाठी पूर्वी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर अशा मोठया शहरात जावे लागत होते. विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय कमी होण्याच्या दृष्टीने व पालकांकडून होत असलेल्या वाढत्या मागणीला अनुसरून संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी सन २००६ मध्ये डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाची स्थापना केली. पुढे पालक व विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने स्वेरी मध्ये सन २०२१ पासून डी. फार्मसी ही दुसरी विद्याशाखा सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डी. फार्मसी परिक्षेत प्रथम वर्षामध्ये शुभांगी बाळासाहेब मिंड यांनी प्रथम (८१.२० टक्के), प्राची धनाजी लोंढे यांनी द्वितीय (७९.४० टक्के) तर प्रचिती वसंत काटकर यांनी तृतीय क्रमांक (७५.६० टक्के) मिळविला तर २०२१ साली स्थापन झालेल्या डिप्लोमा फार्मसीच्या आरती बजरंग मेटकरी यांनी प्रथम (७७.९० टक्के), स्नेहल प्रकाश ननवरे यांनी द्वितीय (७४.६० टक्के) तर वृषाली बळीराम व्यवहारे यांनी तृतीय क्रमांक (७४. ४० टक्के) मिळविला. यशस्वी विद्यार्थ्याना स्वेरीचे संस्थापक-सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार,डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, विभाग प्रमुख डॉ. अनिल लांडगे तसेच इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…