शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदेची प्रतिक्रिया
‘त्या’ विधानाचा घेतला समाचार
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे शिंदे गटाचा केवळ बोलका बाहुला असून ५० खोक्याचे टॉनिक मिळाल्यामुळे आता ते राज्यभर आपले बोलक्या बाहुल्याचे प्रयोग सादर करीत करण्यासाठी फिरत आहेत,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बद्दल बोलण्याइतकी आमदार शहाजीबापू पाटील यांची राजकीय उंची नाही अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी सांगोला मतदार संघातील १ हजार कोटींच्या विकास कामाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.अडीचशे कोटींच्या पहिल्या टप्प्यातील निधीच्या मंजुरीस मान्यता दिली,आणि सहाच महिन्यापूर्वी इतका भरभरून निधी देणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मी अजिबात नाराज नाही असे वक्तव्य करणाऱ्या आमदार शहाजीबापू पाटलांनी नुकतेच माध्यमांसमोर बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बाबत केलेले वक्तव्य म्हणजे केवळ ५० खोक्याच्या बळावर आणलेले उसने अवसान आहे अशीही टीका संभाजी शिंदे यांनी केली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन रहावे, लोकांची कामे करावीत असे विधान आमदार शहाजीबापू पाटील यांनी केल्यानंतर शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून उद्धव साहेबांनी सांगोला मतदार संघातील विकास कामांना दिलेला शेकडो कोटींचा निधी आणि याबाबत स्वतः शहाजीबापू पाटील यांनी सहा महिन्यापूर्वी काढलेले कृतज्ञतेचे उद्गार आणि आता केलेली गद्दारी या दोन्ही गोष्टी सांगोला तालुक्यातील जनता विसरणार नाही अशीच प्रतिक्रिया शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…