ताज्याघडामोडी

6 मुलांच्या आईने 26 वर्षीय प्रियकराची चालत्या रिक्षातच केली हत्या

मुंबई येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी एका ऑटोमध्ये महिलेले आपल्या 26 वर्षीय प्रियकराची चालत्या ऑटोत गळा दाबून हत्या केली. ही महिला 6 मुलांची आई आहे. घटनेनंतर महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व येथील तपेश्वर मंदिराजवळ दुपारी ही घटना घडली, असे आरे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपी महिला आणि पुरुषाचे अनेकदा भांडण होतं होते. शनिवारी दुपारी तिने त्याचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह ऑटोरिक्षात सोडला. त्यानंतर तिने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. दोघेही पवईचे रहिवासी आहेत,” असे पुढे पोलीस म्हणाला. शनिवारी ऑटो रिक्षेमध्ये प्रेयसीने आपल्या जोडीदाराची हत्या केल्यानंतर लगेचच, मुंबईच्या आरे पोलिसांकडे ३० वर्षीय महिलेने आत्मसमर्पण केले. ही महिला एका 26 वर्षीय पुरुषाच्या प्रेमात पडली होती. संबंधित महिला सहा मुलांची आई असल्याचे तरुणाला माहीत होते, तरीही तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. काही कालावधी लोटल्यानंतर महिलेने लग्नाचा आग्रह धरू लागली. मात्र, तरुणाने टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर महिलेने हे पाऊल उचलले, अशी माहिती आरे पोलिसांनी दिली.

प्रेमात आपली फसवणूक झाल्याचे महिलेला वाटले. त्यानंतर तिने प्रियकराला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. मात्र मध्येच प्रियकराने गाडी दुसऱ्या रस्त्यावर वळवली. त्यानंतर महिलेला चांगलाच राग आला आणि तिने मागून तिचा दुपट्टा घेऊन तरुणाचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर महिलेने ऑटो तेथेच सोडली आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आरे कॉलनीतील तपेश्वर मंदिराजवळ दिलेल्या ठिकाणी ऑटोची झडती घेण्यात आली. राइडिंग सीटवर बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या प्रियकराला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणाले की, आम्ही महिलेला भारतीय दंड संहितेच्या आयपीसी कलम 302 हत्या अंतर्गत अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

5 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

5 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago