ताज्याघडामोडी

नवऱ्याचा मोबाइल हिसकावून डोक्यात घातला पाट; पत्नी विरुद्ध गुन्हा

नवऱ्याने बायकोला मोबाईल हाताळण्यास दिला नसल्याच्या वादातून बायकोने बळजबरीने नवऱ्याच्या हातातून मोबाईल खेचून जमिनीवर आपटून फोडला. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन बायकोने रागाच्या भरात लाकडी पाट उचलून नवऱ्याच्या डोक्यात मारत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शहाड गावात घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात बायको विरुद्ध नवऱ्याने विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र दिनकर पाटील वय ३६, राहणार शहाड, कल्याण पश्चिम असे गंभीर जखमी झालेल्या नवऱ्याचे नाव आहे. तर शमिका जयेंद्र पाटील वय २७ वर्षे असे गुन्हा दाखल झालेल्या बायकोचे नाव आहे.

तक्रारदार नवरा जयेंद्र हा बायकोसोबत कल्याण पश्चिम भागात असलेल्या शहाड गावात राहतो. विशेष म्हणजे जयेंद्र हा गावचा पोलीस पाटील आहे. त्यातच रविवारी रात्री साडे दहा वाजता जेवण आटपून नवरा बेडरूममध्ये मोबाईल हातात घेऊन त्या मधील बातम्या बघत होचा. त्याने बराच वेळ झाला तरी मोबाईल बायकोला दिला नाही. म्हणून बायकोने नवऱ्याला मोबाईल देण्याची मागणी करू लागली. मात्र बातम्या बघतोय थोड थांब, असे नवरा बोलत असतानाच बायको शमिकाने नवऱ्याच्या हातामधील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटल्याने मोबाईल तुटला.

त्यानंतर तुझ्यामुळे माझे जीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. तु आमच्यामध्ये येतोस. तुला मी व राहुल भंडारी बघून घेऊ, असे बोलत पूजेसाठी लागणारा लाकडी पाट उचलून बायकोने नवऱ्याच्या डोक्यात जोरात मारला. यामुळे नवऱ्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. बायको एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने राहुल भंडारीला बोलावून तुझे काम आता तमाम करुन टाकते, अशी धमकीही नवऱ्याला दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एम. जाधव करीत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago