ताज्याघडामोडी

खळबळजनक घटना,४ लाखाची सुपारी देऊन प्रेयसीची हत्या

लग्नासाठी आग्रह बेतला जीवावर 

बजरंग तापडे याचे एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून महिलेनं बजरंग याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. लग्नासाठी हट्ट धरलेल्या महिलेला बजरंग याने नकार दिला. लग्नासाठी नकार देऊनही महिलेनं बजरंगला लग्न करण्यासाठी वारंवार विचारणा केली होती. अखेर वैतागून प्रेयसीला संपवण्याचाच निर्णय बजरंगने घेतला. त्याने आपल्या प्रेयसीचा फोटो जवळचा मित्र पाडुंरंग हारके याला दिला आणि तिच्या हत्या करण्यासाठी सुपारी दे, असं सांगितलं. यासाठी सात लाख रुपये देण्याचंही बजरंग याने मंजूर केलं.

बंजरंगचा मित्र पांडुरंग हारके यांना त्याच्या ओळखीच्या गुन्हेगार मित्राशी संपर्क साधला. गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेल्या सचिन थिगळे याला बोलावून त्याला बजरंगच्या प्रेयसीचा फोटो दिला आणि तिची हत्या करण्यास सांगितलं. यासाठी त्याने चार लाख रुपये एडव्हानसही दिला. अखेर 9 ऑगस्टला बजरंगच्या प्रेयसीची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी बजरंग तापडे, त्याचे साथीदार पांडुरंग उर्फ सागर हारके, सचिन थिगळे, सदानंद तुपकर अशा एकूण चौघांना अटक केलीय.पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे सदर घटना घडली आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago