ताज्याघडामोडी

अवैध वाळू उपशाकडे तहसीलदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप

तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित 

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा तक्रारी या तालुक्यातील अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी वारंवार करीत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात या बाबत पाठपुरावाही केला जात होता.मात्र माण परिसरात अवैध वाळू अथवा मुरूम उपसा,वाहुतक  होत नसल्याचे   माणच्या महसूल विभागाकडून वरिष्ठाना सांगण्यात येत होते. आता तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचे आदेश निघाल्यानंतर वाळू उपशाकडे दुर्लक्ष करून वाळू चोरांना अभय देणे तहसीलदारांना भोवल्याची चर्चा माण तालुक्यात आहे.
शिरताव गावच्या हद्दीत असलेल्या ओढ्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या हजारो ब्रास वाळू चोरून नेली जात असल्याची तक्रार उपसरपंच किरण शामराव खळवे यांनी वरिष्ठ पातळवीर केली होती व तहसीलदार येवले यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशीही त्यांची मागणी होती.  सूर्यकांत येवले यांनी तहसीलदार म्हणून तालुक्याचा पदभार घेतल्यानंतर  एकाही अनधिकृत खडी क्रशर अथवा वाळू चोरीविरोधात कारवाई केलेली नाही असाही आरोप सातत्याने करण्यात येत होता.प्रातांधिकारी आणि तहसीलदार येवले या दोघांनाही कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना थेट निलंबित करण्यात आल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago