ताज्याघडामोडी

बॅगेत सापडला तरुणीचा मृतदेह

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड 
पालघर नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या परिसरात असलेल्या झुडपात मृतदेह एका बॅगेत भरून टाकण्यात आला होता. वालीव पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या खाली शुक्रवारी दुपारी एक प्रवासी बॅग आढळून आली. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बॅगेची तपासणी केली. या बॅगेत चादरीमध्ये एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह गुंडाळून टाकण्यात आला होता. तिच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती.
या मुलीची ओळख पटवली असून ती अंधेरी येथे राहणारी आहे. गुरूवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार आल्यानंतर अंधोरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला होता.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपी लोकल ट्रेनमधून उतरून या ठिकाणी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आम्ही आरोपीची ओळख पटवली असून लवकरच त्याला अटक करू अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago