मुंबई –
राज्यभरात रासायनिक खते व बी- बियाणे यांची टंचाई होते आहे, यामुळे शेतकरी सध्या हवालदिल आहे याच प्रश्नाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेतली आहे,
या भेटीत राज्यातील शेतकर्यांना खत दुकानदारांकडून वेळेवर युरिया मिळत नाही,युरिया कमी प्रमाणात दिला जातो,युरिया घ्यायचा असेल तर सोबतच इतर खते बळजबरीने त्यांना खरेदी करण्यासाठी दुकानदार भाग पाडत आहेत, यामुळेच शेतकऱ्यांचे विनाकारण अधिकचे पैसे देखील जातात, आणि विशेष म्हणजे या युरिया लिंकींगच्या साखळीमध्ये कृषीविभागाचे अधिकारी देखील सामिल आहेत त्यामुळेच युरीया लिंकींग हे लोन सर्वत्र पसरले आहे. हे सर्व प्रश्न बागल यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणुन दिले.
युरिया खत लिंकींग मुळे सध्या शेतकर्यांना ऐन पावसाळ्यात खते मिळत नाहीत, पिकांच्या फळधारणा कालावधीतच जर खते मिळाली नाहीत तर राज्यातील शेतकर्यांचे उत्पादन घटेल व त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे बागल यांनी मंत्री सत्तार यांचे लक्ष वेधले.
तसेच सध्या पावसाळा सुरू आहे अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे ती पुरेशी नाही त्यामध्ये वाढ करावी व एकही शेतकरी वंचित न ठेवता अतिवृष्टीग्रस्त भागातील सरसकट शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना मदत करावी अशी ही मागणी बागल यांनी यावेळी मंत्री सत्तार यांच्याकडे केली.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…