सध्या पावसाळा ऋतू सुरू त्यावेळी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत घेऊन जात जा. कधी पाऊस पडेल काही सांगता येत नाही. अशातच आज महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार आहे, याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याच्या येलो अलर्ट-
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची उघडझाप असणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पुढच्या 24 तासांमध्ये हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून, त्या भागात येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य भारतातील कमी दाबाचा पट्टा कमी झाल्याने आज विदर्भात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील बाकीच्या भागात पावसाच्या उघडीपीसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी उकाड्यातही वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
दरम्यान, काल दिवसभरात 24 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये पोलादपूर प्रत्येकी 50, सावंतवाडी, गुहागर, वैभववाडी प्रत्येकी 40, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे जोरदार पाऊस झाला. लांजा, खेड 60, वाकवली, हर्णे, चिपळूण, मंडणगड, कोकणातील दापोली 80, मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…