महाराष्ट्रात पुन्हा धक्कादायक घटना
वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे दोन तरुणांनी 13 वर्षीय शाळकरी मुलीच अपहरण करत धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मुख्य सुमेध मेश्राम आणि त्याच्या सहकारी मित्राला पुलगाव पोलिसांचा शोध सुरू आहे.
पुलगाव पोलिसात तक्रार जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असलेल्या 13 वर्षीय मुलीला तिला ओळखणाऱ्या तरुण सुमेध मेश्रामने चक्क चाकूच धाक दाखवत तिला कारमध्ये बसून अपहरण केले. त्यानंतर त्या कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला आहे. त्यानंतर तिला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत सोडून दिले आहे. अनेकानी अपहरण करतांना हा प्रसंग पाहिला असून पीडित मुलीने आपबीती आईला सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या आईने पुलगाव पोलिसात तक्रार दिली. प्रकरणात पोलिसांनी गंभीरपणे घेत दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.
कशी घडली घटना पीडिता ही नियमितपणे घरातून शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली होती. पण तिच्यावर नराधम सुमेधची वाईट नजर होती. शाळेच्या गेटवर पोहचली, तेव्हा सुमेध मेश्रामने आणि त्याच्या सहकारी मित्राने पीडित मुलीला आवाज दिला. ती थांबताच तिला चाकूचा धाक दाखवत, तिचे तोंड दाबून तिला जोर जबरदस्तीने कारमध्ये बसवले. यावेळी तिने आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी कारची काचे बंद असल्याने आवाज बाहेर न गेल्याने अत्याचार केल्याचे पीडितेच्या तक्रारीत म्हटले आहे. यात मुख्य अत्याचार करता हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे बोलल जात असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…