ताज्याघडामोडी

नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रेयसीवर चाकूचे वार

चार वर्षांपासून सुरु असलेल्या प्रेमसंबंधाची दुर्दैवी अखेर  

मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून फोटोग्राफर  असलेल्या २५ वर्षीय प्रियकराने २४ वर्षीय प्रेयसीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना  घडली आहे. ही घटना बदलापूर  पश्चिम भागातील बेलवली येथील एका इमारतीच्या टेरिसवर घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात  हल्लेखोर प्रियकरावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गवळी राहणार मांजर्ली, बदलापूर असे चाकू हल्ला करून फरार झालेल्या प्रियकराचे नाव आहे.

पीडित २४ वर्षीय तरुणी बदलापूर पश्चिम भागातील बेलवली परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहते. तर आरोपी प्रियकर विशाल हा बदलापूर पश्चिम भागातील मांजर्ली भागात राहून फोटोग्राफरचा व्यवसाय करतो. या दोघांमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यातच १९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास प्रेयसीच्या मोबाईलवर कॉल करून तिला बदलापूर पश्चिम भागातील एका ठिकाणी आरोपी प्रियकराने भेटायला बोलावले होते. मात्र तिने येण्यास नकार देऊन प्रियकराचा मोबाईल नंबर ब्लॉक करून ठेवला.

वारंवार मोबाईलवर कॉल करून लागत नसल्याने नंबर ब्लॉक केल्याचे आरोपीला समजताच तो सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास प्रेयसी राहत असलेल्या घरी गेला. तिला इमारतीच्या टेरिस त्याने बोलवून घेतले. त्यानंतर मोबाईल नंबर ब्लॉक करण्याचा जाब प्रियकराने विचारातच दोघांमध्ये टेरिसवर वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि, प्रियकराने तिला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्याने बेदम मारहाण करून जमिनीवर पाडले. त्यानंतर खिशातून चाकू काढून प्रेयसीवर वार करून पळून गेला. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपी विशाल विरुद्ध २० ऑगस्ट रोजी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. हजारे करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago