ताज्याघडामोडी

पुण्यातील धक्कादायक प्रकार,पत्नीला करायला लावली सर्वांसमोर आंघोळ

घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी म्हणून अघोरी पूजा

पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी म्हणून पती, सासू, सासरे यांनी अघोरी पूजा करीत सुनेला सर्वांसमोर आंघोळ करायला  लावली आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू, सासरे, मांत्रिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीने संगनमताने केली पत्नीची फसवणूक अत्याचार करी पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तित्यावर 3 मे 2013 पासून आतापर्यंत अत्याचार होत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या सर्व प्रकारात पतीनेदेखील त्याच्या आई वडील आणि मांत्रिक यांच्या संगममताने पत्नीवर अत्याचार करीत तिची फसवणूक केली आहे. तसेच, धक्कादायक बाब म्हणजे घरात तसेच व्यवसायात भरभराटी यावी, घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी व पत्नीवरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्रप्राप्ती होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेऊन सर्वांसमोर अंघोळ करायला लावली.

सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल याबाबत पती शिवराज कोरटकर वय ३६ रा. सदनिका क्र. ९०३ कात्रज आंबेगाव, सासरे राजेंद्र कोरटकर वय ६४, सासू चित्रालेखा, मांत्रिक मौलाना बाबा जामदार वय ६२ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पती, सासरे, सासूला पोलिसांनी अटक केली असून, मांत्रिक अजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी भरभराट व्हावी व पत्नीवरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्रप्राप्ती होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेणून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago