ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार

पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश 

ओबीसी राजकीय आरक्षणाक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. बांंठिया आयोगात त्रुटी लक्षात आल्यानंतर न्यायालयाने यावर स्थगिती दिली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील पाच आठवडे परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधीच घोषित झालेल्या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवायच घ्याव्या लागणार, अशी परिस्थिती आहे. सर्वाच्च न्यायालयाचा हा निर्णय S राज्य सरकारला मोठा दणका असल्याचे मानले जात आहे.

ओबीसांची आरक्षण बांठिया आयोगाने तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर पूर्ववत करण्यात आले होते. तथापि, या अहवालात त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्याशिवाय 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याआधीच घोषित करण्यात आल्या होत्या. या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने सध्या असलेली परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील पाच आठवड्यांसाठी हा आदेश देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. अभय ओक, न्या. जे. बी. पार्दीवाला यांनी हे आदेश दिले. २० जुलै आणि २८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश मागे घेण्यात यावेत अशी विनंती राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती. ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांसंदर्भात राज्यातील निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांना मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवावी असे आदेश दिले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago