चालकाने अपघातानंतर चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट
स्व.आ.विनायक मेटे अपघात प्रकरणी देवेंद्र फडवणीस यांची विधानसभेत माहिती
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा घडला, याची सविस्तर माहिती सभागृहाला दिला. विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याची एक चूक विनायक मेटे यांच्या जीवावर बेतली, असा एकंदर सूर फडणवीसांच्या निवेदनातून व्यक्त होताना दिसला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता ड्रायव्हरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा तपास कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, विनायक मेटे यांनी गाडी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना त्यांच्या गाडीपुढे ट्रॉलर होता. नियमानुसार शेवटच्या ट्रॉलर शेवटच्या लेनमधून चालला पाहिजे, पण तो मधल्या लेनमध्ये चालत होता. त्यामुळे विनायक मेटे यांच्या गाडीला ओव्हरटेक करता येत नव्हते. मेटे यांच्या चालकाने अखेर तिसऱ्या लेनमध्ये जाऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथेही एक वाहन समोर होते. तेव्हा मेटे यांच्या चालकाने ट्रॉलर आणि त्या वाहनाच्या मध्ये असलेल्या थोड्या जागेतून कार काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा अंदाज पूर्णपणे चुकला. त्यामुळे विनायक मेटे आणि त्यांचा अंगरक्षक गाडीत ज्या बाजूला बसले होते, त्या बाजूला ट्रॉलरची जोरदार धडक बसली. त्यामुळे विनयाक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गाडीचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या चालकाने सर्वप्रथम ११२ नंबरवर फोन केला, हा फोन नवी मुंबई पोलिसांना फॉरवर्ड करण्यात आला. तेव्हा चालकाने आम्ही बोगद्यापाशी असल्याचे सांगितले. नवी मुंबई पोलीस तातडीने त्याठिकाणी आले तेव्हा बोगद्यापाशी कोणीही नव्हते. पोलिसांनी बोगद्याच्या दुसऱ्या बाजूलाही जाऊन बघितले. पण तिकडेही कोणीच नव्हते. आता चालकाचा तो फोन खरा होता की खोटा, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यानंतर रायगड पोलिसांना कळवण्यात आले. रायगड पोलीस अपघातस्थळी पोहोचले तेव्हा मेटे यांची गाडी बोगद्यापासून बरीच लांब होती. मेटे यांच्या गाडीचा चालक भांबावला होता की माहिती नाही. पण त्याने दिलेली माहिती चुकीची होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…