विवाहबाह्य अनैतिक संबंधाचा शेवट
उत्तरप्रदेश राज्यातील झाशी येथे प्रियकराने प्रेयसीला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून तिची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालपुरा येथील मोनिका उर्फ मोना अहिरवार (वय 24) हिचा विवाह साडेसहा वर्षांपूर्वी लक्ष्मीगेट येथील विजय अहिरवार याच्याशी झाला होता. त्यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. मात्र, मोना हिचे निक्की साहू उर्फ निखिल याच्यासोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध होते.तिच्या पतीने सांगितले की, “दोन वर्षांपूर्वी त्याला या नात्याबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर त्याने अनेकवेळा तिला घटस्फोट मागितला असता मोनाने नकार दिला. मोनाला घराबाहेर पडण्यापासून रोखले की ती भांडण करायची. 3 महिन्यांपूर्वी ती भांडण करून तिच्या माहेरी गेली होती. 15 दिवसांपूर्वी फोन आला होता. तिला घरी येण्यास सांगितले असता तिने काही दिवसांनी येते, असे सांगितले. मात्र, शनिवारी रात्री तिच्या हत्येची बातमी मिळाली.
मोनिका उर्फ मोनू अहिरवार हिचे बारागाव गेट बाहेरील रहिवासी निक्की साहू याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दरम्यान, काल रात्री निक्कीचा वाढदिवस होता. निक्कीने मोनिकाला संध्याकाळी केक कापण्यासाठी बोलावले होते. यामुळे मोनिका आपल्या नातेवाईक महिलेसोबत नारायणबागेत गेली. तिथे मोनाचा आपल्या प्रियकरासोबत वाद झाल्यानंतर त्याने मोनिकाच्या गळ्यात चाकूने वार केले. यानंतर मोनिकाला रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.
पोलीस चौकशीत सांगितले की, आमचे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, मोनिकाच्या दागिने आणि पैशांच्या मागणीला तो कंटाळला होता. त्यामुळेच त्याने आपली प्रेयसी मोनिकाची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…