भाजप नेत्याच्या ट्विटने राजकीय गोटात खळबळ
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. आहेत. त्यानंतर विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मोहित कंभोज यांनी थेट आमदार रोहित पवार यांना आव्हान दिले आहे. त्यांनी बारामती अॅग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार असल्याचा इशारा दिला आहे.
भाजप नेते मोहित कंभोज यांनी ट्विटमध्ये म्हटले, की बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी केस स्टडी आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागील यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे. तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आमदार रोहित पवारांनी मोहित कंबोज यांचे हे प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मोठे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक हे या अगोदरच ईडीच्या कारवाईने तुरुंगात आहेत. त्यातच आता या दोन नित्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार अशा आशयाचे ट्विट करत मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर सतत ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. काल केलेल्या ट्विटमध्ये माझे हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा, असे सूचक इशारा देणारे ट्विट मोहित कंबोज यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कशा माहिती होतात असा प्रश्न विचारला जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…