पाचही हल्लेखोरांना पोलीस कोठडी
गणपतीच्या वर्गणीवरून मंडळातील पाच जणांनी मिळून केंद्रीय गुप्तवार्ता अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील टेमघर भागातील केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. विश्वनाथ बाळाराम पाटील वय ३६ वर्षे, प्रतीक विलास बोरसे वय २६ वर्षे, राहुल राधाकिसन राहुलवार वय ३३ वर्षे, सागर पंढरीनाथ पाटील वय २५ वर्षे, जतिश रमेश फुलोरे वय २७ वर्षे अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर सुखसागर कुंदनसिंग रावत वय ३९ वर्षे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
जखमी रावत हे भिवंडीतील गोपालनगरमध्ये कुटूंबासह राहत असून त्यांचे टेमघर भागातील हरिहरेश्वर सोसायटीमध्ये केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे शासकीय कार्यलय आहे. त्यातच गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेवला आहे. त्यासाठी सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांची वर्गणीगोळा करण्यासाठी धावपळ सुरु आहे. अश्याच भिवंडीतील टेमघर भागातील साईश्रद्धा मित्र मंडळ, टेमघर यांच्या मंडळातील कार्यकर्त्यांची वर्गणी गोळा करण्याची धावपळ सुरु असतानाच याच मंडळातील काही कार्यकर्ते १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या शासकीय कार्यालयात जाऊन बळजबरीने रावत यांना गणपती वर्गणीची मागणी केली. मात्र त्यांनी वर्गणी देण्यास नकार देताच पाच आरोपींनी त्यांना कार्यालयातच बेदम मारहाण करत त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते बेशुद्ध झाल्याचे पाहून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.
रावत बेशुद्ध झाल्याचे पाहून त्यांना इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारनंतर ते शुद्धी येताच शांतीनगर पोलीस ठाण्यात त्यांनी हल्लेखोर विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०७, ३५३, ४५२, १४३, १७४, १८४, १४९, ३८५, ३८७, प्रमाणे गुन्हा दाखल काही तासातच पाचही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) किरणकुमार कबाडी करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…