शुल्लक कारणावरून घेतला टोकाचा निर्णय
गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर नाराज असलेल्या प्रियकराने विष प्राशन करुन स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता अशी भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या घटनेमुळे त्याची प्रेयसीदेखील भेदरली आहे. एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर प्रियकराने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा शहरात आहे. प्रियकरावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एव्हरग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रियकराचे शतक जांगडे असं नाव आहे. तो 23 वर्षांचा असून गोंदियातील आंबाटोली फुलचुर येथील रहिवासी आहे. तो आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये थांबला असताना दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणाच्या रागातून शतकने विष प्राशन करून टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. शतकने टोकाचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेल प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या प्रियकरावर गोंदियातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
प्रेयसीवर नाराज झालेल्या एका तरुणाने संतापात टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. या तरुणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये संबंधित घटना घडली आहे. विशेष म्हणजे एव्हरग्रीन हॉटेलमध्ये गेल्या आठ महिन्यातील ही तिसरी घटना आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…