नांदेड शहरातील तेहरा नगर भागातील अंध दाम्पत्याचा डोळस आधार असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर तिचे प्रेत नदीत आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या आहेत. काकाने या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अंध दाम्पत्याचा सहा वर्षीय मुलगीच मोठा आधार होती 13 ऑगस्ट रोजी घरासमोरून तिचे अपहरण करण्यात आले होते. शुक्रवारी गोदावरी नदी पात्रात तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.अंध भावाने दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी चिमुकलीची हत्या केल्याची कबूली मृत मुलीच्या काकाने दिली.
पोलिसांच्या चौकशीत त्या मुलीला तिच्या काकासोबत काही महिलांनी पाहिले होते. परंतु त्यानंतर तो पसार झाला होता. मयत मुलीच्या वडिलांनी ही तिच्या कानात असलेल्या दागिन्यांसाठी काकाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर शिवाजी नगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि माने, सहाय्याक पोली निरीक्षक शिवसांभ घेवारे यांनी शनिवारी रात्री शहरातील सहारा लॉज येथून आरोपी संतोष सखाराम हटेकर याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर चिमुकलीवर अत्याचार झाला का याचा खुलासा होऊ शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला त्याच्या भावाने त्रास दिला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिलीय. आंधळ्या जोडप्याला या डोळस मुलीचा आधार होता. म्हणूनच मी तिला मारलं अशी कबुली आरोपीने दिलीय. या मुलीच्या आठवणीत आपल्या भावाला रोज दुःख झालं पाहिजे असा आपला हेतू असल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले. इतकंच काय तर मला मारू नका मी सगळं खरं ते सांगतो अस सांगून आरोपीने चक्क पोलिसांना कोर्टात बघून घेण्याची भाषा वापरल्याची चर्चा आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…