गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘अॅक्सलरेशन अँड इंक्यूबेशन: विद्यार्थी आणि विद्याशाखांसाठी संधी– सुरवातीच्या टप्प्यातील उद्योजक’ या विषयावर एकदिवसीय ‘उद्योजकता विकासपर सत्र’ संपन्न झाले.
‘स्वेरी, इन्स्टिट्युशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ (आयआयसी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स (आय ट्रीपल ई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात ‘सोबस इनसाईट फोरमचे कम्युनिटी अँड प्रोग्रामचे संचालक गिरीश संपथ हे ‘अॅक्सलरेशन अँड इंक्यूबेशन: विद्यार्थी आणि विद्याशाखांसाठी संधी– सुरवातीच्या टप्प्यातील उद्योजक’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘इनक्यूबेटर’चे मुख्य कार्य म्हणजे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा ‘स्टार्ट अप’ साठी भांडवल नसते अशा लोकांना मदत करणे. दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात. त्या कशा दूर कराव्यात? त्यावर उपाय कोणते? याबाबत माहिती दिली. ‘तंत्रज्ञान विकसित करणे म्हणजे एखादी संकल्पना आखुन नवनिर्मिती करणे व निर्माण केलेल्या उत्पादनाबाबतचा प्रोजेक्ट तयार करणे व त्या प्रोजेक्टचे प्रॉडक्ट मध्ये रूपांतर करणे होय.’ असे त्यांनी प्रतिपादन केले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप बाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी संपथ यांनी विद्यार्थ्यांना ‘बिझनेस लाइफ सायकल’ पटवून देताना ‘बिझनेस लाईफ स्टेज’च्या स्टार्टअप प्रक्रिया सांगितल्या. पहिल्या प्रक्रियेत बिझनेस संकल्पनेविषयी माहिती घेणे, त्यावर संकल्पना प्लॅटफॉर्म सेटअप करणे, प्रोफाईल चे क्रिएटिव्ह करणे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑफिस सेटअप, संकल्पना प्रमाणीकरणाचा पुरावा त्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता करून ग्राहकांचा शोध घेणे. नंतरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारण १२ ते १८ महिन्यांच्या कालावधी मध्ये व्यवसायाच्या मूल्यांच्या नाविन्यता शोधून त्यांचे मूल्यमापन करणे. जे विक्रीच्या वस्तू बनवीत आहेत त्या वस्तूंबद्दल अभिप्राय घेणे व आपला बिझनेस वाढवणे. व्यवसाय भविष्यात मोठे होत असल्याने भागीदारी तत्वावरही व्यवसाय केले जाऊ शकतात. चौथ्या टप्प्यात ग्राहकांचा महसूल कसा वाढेल हे पाहणे गरजेचे आहे. याच बरोबर भौगोलिक दृष्ट्या आपला व्यवसाय कसा वाढवता येईल हे ही पाहणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसायात नवीन काही बदल करता येईल का, याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. स्वतःची व्यवसाय संकल्पना कशी निर्माण करायची? व्यवसाय संकल्पनेची जीवन प्रक्रिया कशी असते? या बरोबर व्यवसायातील अनेक प्रश्नांची उत्तरे यावेळी गिरीश संपथ यांनी दिली. या सत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एस.एस. गावडे यांनी काम पाहिले.