ताज्याघडामोडी

शिक्षकाने दारू पिऊन वर्गातच केली लघुशंका

जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

अमरावती जिल्ह्यात धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल शाळेतील शिक्षकाने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करणे सोडून शाळेला सुटी झाल्याचे सांगितले व मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोप घेऊन तेथेच लघुशंका केली आहे. त्याची ही अवस्था बघण्याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला असता. तो उलट पालकावरच दादागिरी करत होता. त्याची व्हिडिओ शूटिंग काढून व त्याची लेखी तक्रार पालकांनी त्याच्यावर कारवाई करण्याकरिता धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांना दिली आहे.

धारणी पंचायतमधील शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. तेथे गावातील 200 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना विद्या दानाचे कार्य करण्याकरता एकूण 4 शिक्षक शाळेत कार्यरत असून त्यापैकी एक शिक्षका प्रसूती रजेवर आहे. अन्य 3 शिक्षक शाळेत कार्यरत असतात. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान 3 पैकी एक सहायक शिक्षक पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण वय 38 हा शाळेत दारू पिऊन आला व त्याने त्याच्या वर्गातील विद्यार्थांना आज शाळेला सुटी असल्याचे सांगितले.

वर्गातील खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथे झोपला. झोपेतच लघुशंका केली त्यादरम्यान वर्गातील विद्यार्थ्यांनी त्याची ही अवस्था बघितली व स्वतःच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. त्यावेळी उपसरपंच अशोक कासदेकर पालक वर्ग सुरेंद्र पटोरकर, भुरेलाल बेठेकर शाळा वयवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जांभेकर उपाध्यक्ष नंदलाल जावरकर हे शाळेत पोहचले. शाळेत शिक्षक पृथ्वीराज चौहान हा दारूच्या नशेत खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथेच लघुशंका केलेल्या अवस्थेत आढळला. पालकांनी त्याला झोपेतून उठवल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवता, आज सुटी का दिली अशी विचारणा केली असता. तो त्यांच्यावरच दादागिरी करत होता.नशेत असणारे शिक्षक आमच्या शाळेतून हाकला व दुसऱ्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करणार असल्याचे काकरमलचे उपसरपंच अशोक कासदेकर यांनी सांगितले आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago