ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी

चोरीचे ५० मोबाईल हस्तगत,२ चोरटे ताब्यात

पंढरपूर शहर पोलीस पोलिसांनी प्रशंसनीय कामगिरी केली असून, दोन आरोपींसह त्यांच्याकडून ५० चोरीतील मोबाईल हस्तगत केले आहेत.पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्या असल्याची तक्रार एका नागिरकाने दिली असता तपास करत असताना, सदर मोबाईल सांगोल्यातील एक नागरिक वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदर व्यक्तीस  ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हा मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडून घेतला असल्याचे सांगितले. आणि तपासास गती मिळाली. सांगोला तालुक्यातील पारे येथून सदर इसमास ताब्यात घेतले, त्याची चौकशी केली असता, तो इसम सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. सदरचा मोबाईल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पारेवाडी येथील आरोपीस ताब्यात घेऊन, आणखी चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदाराची माहिती दिली. त्यासही ताब्यात घेण्यात आले. सदर दोन्ही इसमांची कसून चौकशी करून त्यांच्याकडून  ५० मोबाईल हस्तगत करण्यात आले.

सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी.व्ही.केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी, पो. हे.कॉ. सुरज हेंबाडे, शरद कदम, बिपिन ढेरे ,दादा माने, राकेश लोहार, शोएब पठाण, सचिन हेंबाडे, सुजित जाधव, पो.कॉ. समाधान माने, तसेच, सोलापूर ग्रामीणच्या सायबर शाखेचे पो.कॉ. अन्वर आतार यांनी कामगिरी पार पाडली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago