Categories: Uncategorized

प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड शनिवार पासून सुरु

२३ ऑगस्ट पर्यंत चालणार प्रक्रिया

‘शै. वर्ष २०२२-२०२३ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची  पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) शनिवार, दि. २० ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया  मंगळवार, दि.२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:००  वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी डिप्लोमाच्या  फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६४३७) मध्ये ऑनलाईन कॅप राउंड साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. या प्रवेशाची अलॉटमेंट यादी  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे.’  अशी माहीती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मिसाळ यांनी दिली.
       सन २०२२-२३ च्या पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी,  अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता शनिवार, दि.२० ऑगस्ट पासून ते मंगळवार, दि.२३ ऑगस्ट पर्यंत प्रवेशाची पहिली फेरी (कॅप राउंड-१) चालणार आहे. यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याबाबत चे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी नीट अभ्यास करून कॅप राऊंड- १ चे ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे  निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे. कॅप राउंडच्या या चार दिवसात घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सर्व बाजूंनी विचार करून योग्य महाविद्यालयाची निवड करावी. तीन वर्षे मौज मजा करण्यापेक्षा तीन वर्षे परिश्रम करून घेणाऱ्या महाविद्यालयाची निवड करावी, जेणेकरून भविष्यकाळ सुखाचा व समृद्धीचा जाईल. डिप्लोमा प्रथम वर्षासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना या पहिल्या कॅप राऊंडचा लाभ घेता येणार आहे. पहिल्या फेरीसाठी जागावाटप  गुरुवार दि.२५ ऑगस्ट २०२२  रोजी प्रदर्शित केले जाईल. पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती शुक्रवार दि. २६ ऑगस्ट २०२२ ते सोमवार दि. २९ ऑगस्ट २०२२ या दरम्यान करता येईल व त्यानंतर जागा वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करण्याची मुदत शुक्रवार दि. २६ ऑगस्ट २०२२ ते मंगळवार दि. ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत असेल. प्रथम वर्ष डिप्लोमा च्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस. गायकवाड (मो.९८९०५६६२८१) व प्रा. एम.एम. मोरे (मो. ९४२१९६०२५८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पदविका अभियांत्रिकीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर व कॅम्पस प्लेसमेंटच्या विक्रमी निवडीवर स्वेरीमध्ये अभूतपूर्व गर्दी होण्याची चिन्हे आहेत.  प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago