तुमच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली आहे. तुम्ही पोलीस ठाण्यात या, असे म्हणून एका नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलवले. मात्र निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी चापट मारल्यानंतर संबंधित व्यक्तीने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी शहरात घडली आहे. राजेश लहाने असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयताची मुलगी धनेश्वरी लहाने हिने नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन आरोपी वंदना मोरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 ऑगस्ट रोजी राजेश भुजंगराव लहाने हे रात्री घरी असताना त्यांच्या मोबाईलवर पोलिसांचा फोन आला. तुमच्या विरुद्ध वंदना मोरे यांनी तक्रार दिली आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला या असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर राजेश लहाने, त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत नवा मोंढा पोलीस ठाणे येथे गेले. या ठिकाणी निर्भया पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने पथकाकडे तुमच्या विरुद्ध वंदना मोरे यांनी अर्ज दिला आहे, असे सांगितले. यावेळी झालेल्या बाचाबाचीत कर्मचाऱ्याने चापट मारली. त्यानंतर सर्वजण घरी निघून आले. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राजेश लहाने घराबाहेर पडले. उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलिसांनी राजेश लहाने यांच्या घरी आले. तुमच्या वडिलांनी चालत्या रेल्वेखाली उडी मारली असल्याचे धनश्री लहाने आणि नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर राजेश लहाने यांच्या नातेवाईकांनी नवमुंडा पोलीस ठाण्यामध्ये जमून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली.
जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याचा पवित्रा त्यांनी 16 ऑगस्ट रोजी रात्री घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईक पोलीस ठाण्यामधून निघून गेले. या प्रकरणी धनश्री लहाने हिने दिलेल्या तक्रारीवरून 16 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आरोपी वंदना मोरे हिने सतत त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…