ताज्याघडामोडी

पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने मानसिक तणावात येऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. चंद्रिकाप्रसाद निर्मल वय 50 वर्षे असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी अंधेरी येथील अंबोली पोलिसात आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला.

चंद्रिकाप्रसाद निर्मल यांचा कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. त्यांची पत्नी गीतादेवी मागील काही दिवसांपासून पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पोटात स्टोन असल्याचे सांगून शस्त्रक्रियेने तो काढण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये खर्च येणार होता. पण चंद्रिकाप्रसाद यांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पैसे नव्हते. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे मानसिक तणावाखाली होते.

शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांनी ग्राहकांच्या कपड्यांना इस्त्री केली व कपडे घेऊन ते निघाले होते. त्यावेळी अंधेरी पश्चिम येथील रेड रोड इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गच्चीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांना तात्काळ कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago