ताज्याघडामोडी

हॉरर चित्रपट पाहून स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लीटर पेट्रोल ओतून घेतलं जाळून

देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. अरुंधती हा चित्रपट पाहून एका 23 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

कर्नाटकातील टुमकारू जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एक तरुण अरुंधती चित्रपटाची कॉपी करत होता. अरुंधती हा एक तेलुगू हॉरर चित्रपट आहे. तरुणाने हा चित्रपट तब्बल 15 वेळा पाहिला आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम झाला. चित्रपटाच्या नादात त्याने अकरावीनंतरचे शिक्षणही सोडले.

रेणुका प्रसाद असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अभ्यासात खूप हुशार होता आणि नेहमी त्याच्या वर्गात पहिला क्रमांक पटकवायचा. त्याला या चित्रपटाचे इतके व्यसन लागले की त्याने आपले शिक्षणही सोडले. घरच्यांनी त्याला चित्रपट पाहण्यास मनाई देखील केली. पण, त्याने ऐकलं नाही. हा तरुण त्याच्या कुटुंबीयांशी चित्रपटाची कॉपी करण्याबाबत बोलायचा. मात्र, घरच्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तरुणाने चित्रपटातील एक दृश्य कॉपी करण्याचा प्रयत्न केला.

चित्रपटाच्या नायकाप्रमाणेच रेणुका प्रसादने बुधवारी गावाच्या बाहेरील भागात सुमारे 20 लीटर पेट्रोल अंगावर ओतलं आणि स्वत:ला पेटवून घेतलं. रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी त्याला जळत असलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो जवळपास ६० टक्के भाजला होता. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोडिगेनहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. रेणुका प्रसाद याच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रेणुका प्रसादच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने चांगला अभ्यास करावा आणि चांगले करिअर करावे अशी त्यांची इच्छा होती. दुर्दैवाने सिनेमाच्या व्यसनाने त्याचा जीव घेतला. तेलुगू सुपरहिट चित्रपट ‘अरुंधती’मध्ये अभिनेत्री स्वतःच्या इच्छेनुसार मरते आणि शत्रूचा बदला घेण्यासाठी तिचा पुनर्जन्म होतो. या चित्रपटापासून प्रेरित होऊन रेणुका प्रसाद याने त्याच्या इच्छेनुसार स्वत:ला जाळले, कारण त्यालाही पुनर्जन्म घ्यायचा होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago