ताज्याघडामोडी

कर्मयोगी मध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया “मार्गदर्शन केंद्र” सुरू.

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज : हृषिकेश परिचारक

अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही वेळेस चुका होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कर्मयोगी महाविद्यालयाच्या मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यानी आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतीपादन श्री. हृषिकेश परिचारक यांनी केले. कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे येथे सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2022 च्या “मार्गदर्शन केंद्राचे” उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या बाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षामार्फत बी टेक 2022 साठीची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. यासाठी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चालू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यानी महाविद्यालयातील या केंद्रातून मार्गदशन घेऊन अचूकपणे ही प्रक्रिया पूर्ण करावी. या मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल मुडेगावकर, महाविद्यालयाचे एडमिशन इन्चार्ज डॉ. अभय उत्पात तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago