ग्राहक मंचाने बजाज फायनान्सला ठोठावला मोठा दंड
सोलापूर जिल्ह्यातील दादा परबत राऊत रा.पोंधवडी ता.करमाळा यांनी दिनांक 13/ 07/2019 रोजी फ्लिपकार्ट ऍप वरून नवीन मोबाईल आँनलाईन घेतला होता बजाज फायनान्स EMI कार्ड वरून घेतला होता.त्यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी रोजी दोन महिन्यांत पूर्ण EMI ऑनलाईन भरला व त्याच दिवशी ऑनलाईन noc देखील मिळाली होती परंतु पुर्ण EMI भरल्यानंतर देखील दिनांक 02/10/2019 रोजी व 04/10/2019 रोजी अनुक्रमे 295 +295 रुपये चार्ज त्यांच्या अकाउंट मधून कट केला गेला.त्यांनी पैसे कट करण्याचें कारण बँकेमध्ये विचारले असता बँकेने मला सांगितले बजाज फायनान्सचे तुमच्या वरती कर्ज आहे त्यांनी ऑनलाईन बँकेला ECS टाकल्यामुळे तुमच्या खात्यात मिनी मन बॅलन्स नसल्यामुळे तुम्हाला चार्ज लागला आहे. दादा परबत राऊत बँकेला बजाज फायनान्सचे कर्ज वनटाईम भरले असल्याचे सांगत एनओसी दाखविली पंरतु बँक ऐकून घेत नव्हती, बजाज फायनान्सला याबद्दल विचारणा केली असता त्यांनी पण उडवा उडवीचे उत्तर दिले.
त्यामुळे तक्रारदार दादा परबत राऊत यांनी शेखर कोलते सर व राहुल कदम व विजय सागर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत वकील उदय चव्हाण यांना सर्व प्रकार सांगितला. जिल्हा ग्राहक मंच औरंगाबाद येथे तक्रार दाखल केली फक्त 590 रुपयांसाठी अडीच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला.अखेर माननीय जिल्हा ग्राहक मंच औरंगाबाद यांनी बजाज फायनान्स यांना 10000 दंड ठोठावला व अतिरिक्त 590 रुपये कटलेले 3.25 टक्के व्याजाने देण्याचा निकाल दिला आहे.बजाज फायनान्स च्या वसुली बाबत अनेक ग्राहक सातत्याने नाराजी व्यक्त करताना दिसतात मात्र योग्य पाठपुरावा केला तर या बड्या कंपनीला देखील कायदेशीर मार्गाने झुकविता येते एवढे मात्र निश्चित.