ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तब्बल ४१ विद्यार्थ्यांची ‘इस्ट सन इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’ कंपनीत निवड

पंढरपूरः‘इस्ट सन इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ४१ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
      पुणे येथील ‘इस्ट सन इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून पायल हनुमंतराव अभंगराव, जागृती जगन्नाथ धेंडुळे, वैष्णवी संजय गंगेकर, ऋतुजा राजेश जाधव, शीतल चंद्रकांत जगताप, समीक्षा कैलास कोरके, मंजू गोपीचंद लोंढे, पल्लवी संजय माने, विशाखा प्रमोद माने, सागर हरिदास भानवसे, स्नेहल नारायण भोंडवे, स्नेहल पोपट दळवे, वैष्णवी रामेश्वर ढोले, गायत्री राजेंद्र एकतपुरे,विशाल आन्नासो इंगळे, साक्षी धनंजय काळे, अभिजित अरविंद कांबळे, गोरखनाथ मधुकर खरात, समीर संभाजी कोकणे, शिवानी बाळासाहेब महानवर, अश्विनी दर्लिंग माने, दिपाली बाळकृष्ण मेटकरी, बिजली शहाजी पाटील, पूनम हनुमंत होमकर, संगीता नारायण पुजारी, वैष्णवी वैभव उंबरे, विद्या तानाजी ढेरे, विद्या रमेश पाटील, विनय बाळू वाघमारे, नारायण इंद्रजीत घाडगे, ऋषिकेश राजेंद्र जाधव, शिवाजी भिवाजी सुरवसे, गायत्री चिमाजी भंडारे, श्वेता सुभाष जमदाडे, करण औदुंबर शिंदे, विशाखा रवी चव्हाण, प्राजक्ता अंकुश मोरे, तनुजा गौतम घोलप, तेजस्वी बापु थोरात, उर्मिला अतुल शिंदे व सुजित सुधाकर नंदवते या ४१ विद्यार्थ्यांची निवड केली. श्री. विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरीमधून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांचा  कल देखील स्वेरीकडे आहे. स्वेरी मधून विविध कंपन्यात प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या  दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या  आकडेवारीवरून दिसून येते. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व  मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते.   मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव असताना देखील कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तब्बल ६०० पेक्षा अधिक नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे स्वेरीने प्रवेश प्रक्रियेत व वार्षिक परीक्षेच्या निकालात मारलेली गरुड झेप दिसून येते तर दुसरीकडे स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’ चे ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago