ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे ‘नागपंचमी’ या सणानिमीत्त कार्यक्रमांचे आयोजन

सर्प हे शेतकऱ्यांचेमित्र असतात.सर्पांमुळेच अन्नचक्र प्रक्रिया                                                 सुरळीत चालू राहते – प्राचार्या  प्रियदर्शिनी एस.

दि.०२.०८.२०२२ रोजी ‘नागपंचमी’ या सणानिमीत्त कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये  प्रि-स्कुल ते माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना सापांची अधिक माहिती व्हावी तसेच सापांबाबत गैरसमज दूर व्हावेत यासाठी सर्पमित्र अशिष कथले व युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथील एनजीओ मार्फत प्राण्यांचे डॉ.प्रल्हाद भिसे यांनी विद्यार्थ्यांना विविध सर्पांविषयी माहिती देताना सर्पदंशाबद्दलची उपाययोजना इत्यादीविषयीची माहिती दिली तसेच यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात सर्पांविषयी असणा-या प्रश्नांचे निरसन केले.

          यावेळेस कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या सौ.प्रियदर्शिनी एस. यांनी विद्यार्थ्यांना सर्पज्ञानाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कर्मयोगी विद्यानिकेतनचे सहशिक्षक सुनील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

          यावेळी संस्थेचे मुख्य विश्वस्त मा.रोहनजी परिचारक यांनी सर्व विद्यार्थ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

          यावेळी संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.गिरीश खिस्ते यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago