ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज होता मुलीचा बाप

प्रियकराने केली भररस्त्यात हत्या 

 नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेम संबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली. त्यामुळे त्यांनी घर बदलले या रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी (काल) सकाळी शहरातील गिट्टीखदान परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या जवळ नारायण द्विवेदी यांची भर रस्त्यात हत्या झाली होती. नारायण यांची हत्या मृतकच्या जुन्या घर मालकाच्या २० वर्षीय मुलानेच केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलराम पांडे या घर मालकाचा मुलाला अटक केली आहे

आरोपी बलराम पांडेचे नारायण द्विवेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. तो सतत द्विवेदी यांच्या मुलीचे पाठलाग करायचा, छेड काढायचा. याच मुद्यावरून नारायण द्विवेदी यांनी एक दोन वेळेला बालरामला समजावले होते. त्यांनी बालरामच्या वडिलांना ही माहिती दिली होती. बलरामच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी द्विवेदी कुटुंबाने पांडे यांचे घर सोडून जाण्याचा निर्धार केला.

तीन दिवसांपूर्वी द्विवेदी कुटुंबीयांनी घर बदलवले. दुसरीकडे राहायला गेल्यावर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीच आरोपी बलरामने नारायण द्विवेदी यांना दिली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काल सकाळी नारायण द्विवेदी आपल्या कामावर जाण्यासाठी दुचाकीने घरातून निघाले. तेव्हापासून बलराम त्यांचा पाठलाग करत होता. ते गिट्टीखदान परिसरात गुन्हे शाखेच्या जवळून जात असताना बलरामने त्यांना अडविले आणि त्यांच्यासोबत वाद उकरून काढत प्राणघातक हल्ला केला. आरोपीने चाकूने नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावरच कोसळले, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago