ताज्याघडामोडी

स्वेरी मध्ये उच्च शिक्षण संस्था चालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक संपन्न

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मंगळवार दि. २६ जुलै रोजी शिक्षण संस्थाचालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक संपन्न झाली.

            बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील या होत्या तर या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्थाचालकांच्या संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी ‘शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया शासनाकडून लवकरात लवकर भरण्यासाठी दिनांक ७ ऑगस्ट, २०२२ रोजी बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे होणाऱ्या संस्थाचालकांच्या बैठकीत सदरचा विषय उपस्थित करून माननीय उच्च न्यायालयात भरती संदर्भात दाद मागण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच ‘वेगवेगळ्या विद्यापीठ स्तरावर संस्थाचालकांच्या ज्या विविध संघटना आहेत त्यांचे एकत्रीकरण करून महाराष्ट्रासाठी एक स्वतंत्र संघटना स्थापन करावी’ असेही सर्वानुमते ठरले. सदरची जबाबदारी ‘संघटनेचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी घ्यावी.’ असे सर्वानुमते ठरले. या वेळी उच्च शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० समजून घेणे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. ए. एस. भुईटे, भाभा अणुसंशोधन केंद्राचे जेष्ठ शास्त्रज्ञ व रसायनशास्त्र विभागाचे माजी संचालक प्रा.बी.एन.जगताप व शिक्षणतज्ञ प्रा.आनंद मापुसकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उच्च शिक्षण संस्थाचालकांच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने वेणुनगर (गुरसाळे, ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्धल व व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्यामुळे स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांचा सत्कार संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदर बैठकीचे आयोजन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी उत्तमरीत्या केल्याबद्दल त्यांचा संघटनेचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरच्या बैठकीस कार्याध्यक्ष बाबूराव गायकवाड, सचिव दशरथ गोप, माढा तालुक्याचे माजी आमदार विनायकराव पाटील, चंद्रकांत देशमुख व अनेक संस्थांचे अध्यक्ष, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. संपूर्ण बैठकीचे नियोजन डॉ.जयप्रकाश बिले यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago