ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कामगारांच्या वतीने नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी घवघवीत यश संपादन केलेबद्दल व त्यांच्या ३९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कारास उत्तर देताना चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी सर्व कामगारांचे आभार व्यक्त करुन कारखान्यास गतवैभव आणणेसाठी कारखान्याचे सर्व कामगारांनी यापुर्वी प्रमाणिक काम केलेले असून यापुढेही प्रमाणिक काम करावे. सध्या कारखान्याच्या मशिनरी दुरुस्तीची कामे चालू असून कारखाना पुर्ण क्षमतेने चालविणेचा मानस असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये १४ लाख ५० हजार मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवून सभासद शेतकऱ्यांना रु.२५००/- ऊसदर देणेसाठी कामगारांनी कामे करावीत त्यासाठी कारखान्यास कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. तसेच सर्व संचालक मंडळ व कामगारांनी समन्वय ठेवून चांगल्या प्रकारे काम करुन कारखाना महाराष्ट्रात नंबर १ वर आणून कारखान्यास पुढील ५० वर्षे कोणतीही अडचण येणार नाही अशी आशा व्यक्त केली. तसेच ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेसाठी वाहन मालकांना रु.२.०० लाखाचा पहिला हप्ता देणेत आला. कामगारांचा २०१९ पासून ३१ महिन्याचा पगार व इतर देणी थकीत राहीलेला असून ते टप्या-टप्याने मार्गी लावणेत येतील.

ढे बोलताना ते म्हणाले की नवीन कामगार भरती करताना जुन्या कामगारांच्या अनुभवाचा विचार करुन त्यांना बढती देणेत येईल. कामगारांच्या आरोग्यासाठी आज कारखाना कार्यथळावर विठाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर यांचेतर्फे कारखान्याचे सर्व कर्मचाऱ्याारी वर्गाचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणेत आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी तपासणी करुन घ्यावी असे आरोग्य शिबीर ३ ते ६ महिन्यातून एकदा घेतले जाईल. तसेच कामगारांच्या घरातील महिलांसाठी नवीन उद्योगाचा प्रयोग म्हणून शिलाई मशिनचे ट्रेनिंग देवून त्यांना रोजगार मिळवून देवू.

सदर वेळी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन सर म्हणाले की, कारखाना फक्त अभिजीत (आबा) पाटील हेच चालवू शकतात. त्यांनी आपणास आवाहन केलेले असून त्यांच्या आवाहनास आपण सर्व कामगारांनी साथ दिल्यास कारखान्यास पूर्वी प्रमाणे गतवैभव प्राप्त होईल अशी आशा व्यक्त केली.
स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी केले. सदर प्रसंगी कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, धनंजय काळे, दिनकर चव्हाण, जनक भोसले, प्रविण कोळेकर, अशोक जाधव, साहेबराव नागणे, कालिदास पाटील, कालिदास साळुंखे, संभाजी भोसले, सचिन वाघाटे, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, सिताराम गवळी, सिध्देश्वर बंडगर, सौ. सविता रणदिवे, श्रीमती कलावती खटके, पंढरपूर तिर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, तिसंगीचे सरपंच पिंटु पाटील, सरकोलीचे सरपंच शिवाजी भोसले व कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago