जुन्या माहितीच्या आधारे वृत्त प्रकशित झाल्याचा खुलासा
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सिझन 2021-22 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ आर पी प्रमाणे होणारी एकूण रक्क्म रु.9069.93लाखा पैकी आज अखेर रु.8330.11 लाख ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना, सुमारे 91.84 टक्के एफ.आर.पी. अदा केली आहे. गेली दोन दिवसापासून जुन्या माहितीच्या आधारे सोशल मिडिया व वर्तमान पत्रातुन प्रसिध्द होणाऱ्या बातमीच्या अनुषंगाने सहकार शिरोमणी कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी माहिती दिली.
सदर बातमी विविध दैनिकातुन अपुऱ्या माहितीच्या आधारे प्रसिध्द झाली असल्यामुळे हा खुलासा कारखान्याच्यावतीने प्रसिध्दीसाठी देत आहे.त्यानुसार सहकार शिरोमणी कारखान्याने सन 2021-22 मध्ये एकूण 4,36,333मे.टन ऊसाचे गाळप करुन 9.66 टक्के साखर उताऱ्याने 4,21,500 साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे होणारी एकूण रक्क्म रु.9069.93 लाखा पैकी आज अखेर रु.8330.11 लाख ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केली असून, कारखान्याने सुमारे 91.84 टक्के एफ.आर.पी.अदा केली आहे.उर्वरीत एफआर पी रु.739.86 लाख देय आहे. म्हणजे 8.16 टक्के रक्क्म ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे खातेवर वर्ग करीत आहोत. कारखान्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना वेळोवेळी एफ.आर.पी.ची रक्कम अदा केलेली आहे. तरी सभासद ऊस पुरवठादार यांनी संस्थेबाबत कोणताही गैरसमज करुन घेवु नयेअसे कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…