12 गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी,8 गणात आरक्षण,10 गण महिलांसाठी राखीव
राज्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षण सोडत गुरुवारी पार पडली. याप्रमाणेच पंढरपूर पंचायत समिती गणातील आरक्षण जाहीर करण्यात आले. तहसीलदार
सुशीलकुमार बेल्हेकर यांनी हे आरक्षण प्रांताधिकारी गजानन गुरव आणि गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत जाहीर केले. पंढरपूर पंचायत समितीचे यापूर्वी 16 गण होते आता यात भर पडून 20 गण झाले आहेत.या 20 गणांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.
अनुसूचित जातीसाठीचे आरक्षण अगोदर जाहीर करण्यात आले. वाखरी आणि भोसे हे दोन
जण अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले, तर पिराची कुरोली गण अनुसूचित
जातीसाठी राखीव करण्यात आला. अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या निकषानुसार एकही
राखीव करण्यात आला नाही.महिलांसाठी राखीव करण्यात आलेले गण पुढील प्रमाणे.भोसे , वाखरी – अनुसूचित जाती महिला मेंढापूर, रोपळे,देगाव, चळे आणि तावशी -सर्वसाधारण महिला कासेगाव,पळशी, गोपाळपूर – नामाप्र महिला याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले.
सर्वसाधारण पुरुषाचे आरक्षण उंबरे, करकंब,फुलचिंचोली, पुळुज, भाळवणी,भंडीशेगाव, खर्डी या गणात जाहीर करण्यात आले.उंबरे आणि टाकळी या गणात नामाप्र पुरुषाचे आरक्षण
जाहीर करण्यात आले आहे, तर पिराची कुरोली या एकमेव गणात अनुसूचित जाती पुरुषाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…