ताज्याघडामोडी

टोल नाक्यावर गुंडगिरी

कारमधील जोडप्याला केली बेदम मारहाण

( हरियाणा ) : घामडोज टोल प्लाजा गुरुग्राम येथे बुधवारी बाऊन्सर्सच्या गुंडगिरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये बाउन्सर कार स्वार आणि तिच्या पतीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये महिला टोलनाक्यावरील अडथळा दूर करताना दिसत आहे. तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीने पुन्हा तो अडथळा टोलनाक्यावर लावला. यानंतर अडवणुकीवरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या बाउन्सरने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली . पत्नीला वाचवण्यासाठी पती कारमधून खाली उतरला असता बाऊन्सरने दोघांनाही बेदम मारहाण केली.

   हा सगळा वाद टोल टॅक्स भरण्यावरून झाले असल्याचे सांगितल्या जात आहे. गुरुग्राम पोलिसांनी आरोपी बाऊन्सरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारमधील एक कुटुंब सोहना येथून मारुती कुंजकडे जात असल्याची माहिती आहे. कारमध्ये महिला, तिचा पती आणि कुटुंबीय उपस्थित होते. यादरम्यान टोल प्लाझावर टोल टॅक्स भरण्यावरून महिलेचा टोल कर्मचाऱ्याशी वाद झाला. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या बाउन्सरने महिला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

14 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago