एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या निधीतून २०८ कोटी रुपये खर्च करून पंढरपूर-कुरुल रस्त्याचे काम हाती घेतले जाणार होते. मागील अडीच वर्षात या बाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत.तर पश्चिम महाराष्ट्रातील एशियन बँकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या अनेक कामाचा निधी पुणे जिल्ह्यात व मराठवाड्यात वळविल्याचा आरोप माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला होता.आणि तो खराही आहे.
राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात एशियन विकास बँकेच्या माध्यमातून जवळपास साडेचार हजार कोटी रुपये खर्च करून सण २०२२-२३ मध्ये राज्यातील ७६५ किमी लांबीच्या रस्त्याचे कामे पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले पण यात पंढरपूर तिऱ्हे मार्गे रस्त्याचा समावेश नव्हता.
नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मागील सरकारच्या काळातील निर्धारित करण्यात आलेली प्रस्तावित असेलली जवळपास ५ हजार कोटींची कामे सारे कामे रद्द केलेली आहेत.
वाईटातून चांगले घडते तसे पंढरपूर -कुरुल तिऱ्हे मार्गे रस्ता हा एशियन बँकेच्या निधीतून विकसित करण्याचा निर्णय पुन्हा होईल हि अपेक्षा.
मागील पंधरवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या ‘डागडुजीचे’ टेंडर निघाले होते.तर आता या रस्त्यावरील विविध पुलाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपये अपेक्षित खर्चाचे टेंडर निघाले आहे.राज्यात सत्ता नव्हती.आता शिंदे -भाजपा सरकार आले आहे.अनेक निविदा स्तरावरील कामे रद्द केली जात आहेत.
हा रस्ता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमातून व्हावा अशी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची मागणी आहे.आता राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाली आहे.
त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल आणि या रस्त्याची डागडुजी व इतर कामासाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द होऊन हा रस्ता एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या निधीतून महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्याचा निर्णय होईल हि अपेक्षा !
(सध्या निविदा स्तरावर किरकोळ डागडुजी व दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांच्या कामाची सुरु असलेली निविदा प्रक्रिया रद्द केली जावी अशी अपेक्षा )