ताज्याघडामोडी

सिनियर वकिलाने केले असे काही कृत्य,महिला वकिलाने केली पोलिसात तक्रार

पुणे येथील धक्कादायक घटना

अ‍ॅड. जाधव याच्याकडे ज्युनिअर वकील म्हणून काम करीत आहेत.त्या आरोपीबरोबर मोटारीतून पुण्याकडे येत असताना आरोपीने “मोसम मस्ताना है,” असे म्हणून फिर्यादीकडे किस मागितला. तसेच, शिवाजीनगर न्यायालयात असताना फिर्यादीला नको तेथे स्पर्श करुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच फिर्यादीचे पतीस व फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी न्यायालयात मांडणारे रक्षकानेच एका महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एका वकिलाने ज्युनिअर महिला वकिलाकडे ‘मौसम मस्ताना’ है म्हणत किस मागितला आहे. तसेच, शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या आवारातच या वकिलाने महिलेला लज्जास्पद वाटेल असे वर्तन केलं आहे.

याप्रकरणी एका महिला वकिलाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अ‍ॅड. धर्मराज विनायक जाधव (वय ४०, रा. वाघोली) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे नगर रोडवरील शिक्रापूरजवळ तसेच शिवाजीनगर येथील सिव्हिल बिल्डिंगच्या जिन्याखाली व न्यायालयाचे गेट नं १ जवळ ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता तसेच २६ जुलै रोजी दुपारी सव्वा वाजता घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago