ताज्याघडामोडी

नात्याला काळिमा फासणारी घटना; सख्ख्या भावानेच केले बहिणीचे लैंगिक शोषण

वर्ध्याच्या सर्वसामान्य कुटुंबातील आई वडील मंजुरीसाठी बाहेर जात असतांना 17 वर्षीय मुलाने स्वतःच्याच अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या विकृत मानसिकतेच्या भावाने भीती दिल्याने मुलीने याची वाच्यया केली नाही. परिणामी दुर्लक्ष केल्याने आता तिच्या पोटात दुखत असल्याने ती गर्भवती असल्याचे वैदकीय तपासणीत सेवाग्राम रुग्णलयात समोर आले. यात पीडिता सुरूवातीला काहिही सांगण्यास तयार नव्ह्ती. पण सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातुन तिला विश्वासात घेऊन तिला विचारपूस केली असता त्यात तिने सख्ख्या मोठ्या भावाने जोरजबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नोंद केली. यात आई वडील घरी राहत नसतांना मुलाने विकृत कृत्य केल्याचे समोर आले. यासाठी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या विकृत मानसिकतेचा मागचे कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेने समाजन मन हादरून गेले आहे.

विकृत मनोवृत्तीच्या सख्ख्या भावाने नात्याला काळिमा फसत लहान बहिणीवर अत्याचार करत गर्भवती केल्याचे समोर आले आहे. 15 वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्यानें तपासणी केली असतांना गर्भवती असल्याचे समोर आले. तेच सखी वन स्टॉप सेंटरच्या महिला अधिकाऱ्यांनी आपुलकीने चौकशी केली असताना 11 मध्ये शिकणाऱ्या सख्ख्या भावानेच हे दुष्कर्म केल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago