मुकुंद त्रिंबकराव चिरके सहा महिन्यापूर्वी वेल्हा तलाठी म्हणून येथे कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली भोर येथे झाली होती. सोमवारी सकाळी सात वाजता चिरके हे चार मित्रांसोबत वरवे येथे पोहण्यासाठी गेले होते. पोहताना त्यांना दम लागून ते पाण्यात बुडले . चिरके पोहण्यात सराईत होते. मात्र पोहताना त्यांना दम लागल्याने ते तलावात बुडले. बुडताना मदतीसाठी त्यांनी धावा केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी आणि स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांना यात यश आले नाही. घटनेची माहिती समजताच तातडीने प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील,मंडलअधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भोरच्या भोईराज जल आपत्ती पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केलं,सहा तासांनी त्यांना मृतदेह शोधण्यात यश आलं.मृतदेह पाण्याबाहेर काढताच घटनास्थळी असणाऱ्या नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मनं हेलावून गेली होती.अखेर बचाव पथकाच्या हाती लागला आहे. 6 तासांच्या शोधमोहिमेनंतर भोरमधल्या भोईराज जल अप्पत्ती पथकाला मृतदेह शोधण्यात यश आले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…